The Elephant Whisperers : पण आज आम्ही तुम्हाला एका 41 मिनिटांच्या Documentary बद्दल सांगणार आहोत, जी महावत आणि हत्ती यांच्यातील नात्यावर आधारीत आहे.
The Elephant Whisperers : सध्या कोल्हापुरातील माधुरी नावाची हत्तीण गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अनेक वर्ष कोल्हापुरात वाढलेली माधुरी आता दुसऱ्या राज्यात गेल्याने स्थानिक भावूक झालेले पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, तुम्हाला याच विषयावरील आम्ही एक डॉक्युमेंट्री सूचवत आहोत. जी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
सध्या प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहाण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त पसंती देताना पाहायला मिळतोय. ओटीटीचा काळ सुरु असताना सर्वाधिक चर्चा दर्जेदार चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल होत असली, तरी डॉक्युमेंट्रीज (माहितीपट) देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली खास ओळख निर्माण करतात. आज आपण भारतातील अशाच एका शॉर्ट फिल्मबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या उत्कृष्ट कथेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.
ही 41 मिनिटांची डॉक्युमेंट्री प्रेक्षकांची पसंतीची ठरली आहे. इतकंच नाही, तर IMDB कडून तिला 7.5 इतकी पॉझिटिव्ह रेटिंग देखील मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया, या डॉक्युमेंट्रीचं नाव काय आहे आणि ती कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री
वेब सिरीज आणि चित्रपटांच्या गर्दीत या डॉक्युमेंट्रीने ओटीटीवर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये एक वृद्ध महावत (हत्ती सांभाळणारा) जोडप्याची कथा दाखवली गेली आहे, ज्यांच्यावर एका हत्तीची जबाबदारी सोपवली जाते. हे दोघं त्या मुक्या प्राण्याची कशी काळजी घेतात आणि त्यांचा जीवनसंघर्ष कसा असतो, हे दाखवणारे सीन डॉक्युमेंट्रीला आणखीनच हृदयस्पर्शी बनवतात.
आता तुम्हाला कळलं असेलच आपण इथे ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्री फिल्मबद्दल बोलत आहोत. 2022 साली ही शॉर्ट फिल्म नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली होती. दिग्दर्शिका कार्तिकी गोंसाल्विस यांचं हे सादरीकरण सर्वत्र कौतुकास्पद ठरलं. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून याला भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचं प्रचंड कौतुक झालं. जर तुम्ही अद्याप ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’ पाहिलं नसेल, तर ते नेटफ्लिक्सवर पाहू शकता. यशाचा अंदाज यावरून लावता येईल की IMDB ने याला 10 पैकी 7.5 अशी उत्कृष्ट रेटिंग दिली आहे. महावताचं हत्तीवरील प्रेम आणि हत्तीकडून तशाच पद्धतीने मिळणारा प्रतिसाद सर्वांची मने जिकंतो. प्रेक्षकांसाठी ही डॉक्युमेंट्री हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे.
ऑस्कर जिंकलेली ‘द एलीफेंट व्हिस्परर्स’
‘द एलीफेंट व्हिस्परर्स’ ही अशी शॉर्ट फिल्म आहे, जी भारतासाठी जगातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार म्हणजेच ऑस्कर घेऊन आली. 2023 सालच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात याला सर्वोत्तम डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म म्हणून गौरवण्यात आलं. याच्या निर्मात्या गुनीता मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोंसाल्विस यांच्यासाठी हे एक विशेष यश ठरलं.