मुख्य बातम्या

शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन मैफिल

Spread the love

छ. संभाजीनगर  : २७ जुलै २०२५ ;  आंबेडकरी शाहिरी चळवळीची लेखणी व बुलंद आवाज शाहीर विजयानंद जाधव यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित  अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या ३० जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान ,छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  
         डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारलेल्या या शाहिरी परंपरेला शाहीर विजयानंद जाधव यांनी आपल्या प्रेरणादायी गीतांनी आणखी समृद्ध केले. त्यांच्या या अमूल्य कार्याला , त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या अभिवादन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. रवींद्र जोगदंड हे आहेत तर मा. ऍड तुषार गवळी हे अध्यक्ष म्हणून लाभणारा आहेत. त्याच सोबत डॉ ऋषिकेश कांबळे , ऍड अनिलकुमार बस्ते , दौलतराव मोरे , ह नि . सोनकांबळे ,  विलासभाऊ जगताप , धनंजय माधवराव बोराडे , पंकजभाऊ बनसोडे , डॉ युवराज धबडगे ,ओंकेश बनसोडे ,संदीपभाऊ जाधव,विजयकुमार खंडागळे इ. मान्यवर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
             या प्रसंगी  शाहीर विजयानंद जाधव यांना महाराष्ट्रातील  नामवंत कलावंतांच्या वतीने संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे. नागसेनदादा सावदेकर ,शाहीर मेघानंद जाधव ,डॉ किशोर वाघ , शाहीर चरण जाधव , सपनाताई खरत ,अनुराधा सुरडकर अमोल विजयानंद जाधव,नितीन गायकवाड, संतोष मोरे , वैभव बनसोडे ,अमोल साळवे इ. कलावंत संगीतमय अभिवादन करतील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश अचिंतलवार हे करतील.
       भीमशाहीर विजयानंद जाधव यांना  अभिवादन करण्यासाठी आपण सर्व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  उपस्थित राहावे असं आवाहन शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्टान यांनी केलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *