मुख्य बातम्या

Pankaja Munde : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला एसटीपी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश

pankaja munde pankaja munde file photo
Spread the love

Pankaja Munde : ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांटवर धाडी टाका. प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघा, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. उद्योजकांच्या समस्या, प्रदूषण वाढीची कारणे आणि उपाययोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत पंकजा मुंडे म्हणाल्या की, एका देशाने कचरा केला तर इतर देशांनी करायला पाहिजे का? आता ग्लोबल प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगाला जपून पर्यावरण रक्षण करायचे. रेड झोनसारख्या वेगवेगळ्या झोनमध्ये प्रदूषण कमी करणे हे महत्वाचे काम आहे. आपण जेवढे पाणी वापरतो, त्यापैकी 48 टक्के पाणी ट्रीट करतो. 52 टक्के पाणी वाया जाते. पंतप्रधान मोदींच्या लक्षात आल्यानंतर नमामी गंगासारखे उपक्रम सुरू केले. तुम्ही उद्योग सुरू करतात, त्यामुळे तुम्हाला सर्व सुविधा पाहिजे ही अपेक्षा असते. उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची जबाबदारी आहे. आधी जबाबदारी उद्योग विभागाची आहे, प्रदूषण झाल्यानंतर आमचे काम सुरू होते. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जे प्रकल्प उभे करायचे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. काही उद्योग विभागाकडून करावे लागतील. पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, असे त्यांनी म्हटले.

मागे मी मंत्री झाले तेव्हा कुंभमेळा भरला, आता पुन्हा…
ईडी वैगेरे कशा धाडी टाकतात, तशा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसटीपी प्लांट धाडी टाका, प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जाते की नाही ते बघण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सीएसआर फंडातून जसे मंदिर, शिक्षणासाठी पैसे उभे करतात, तसे तुम्ही पर्यावरणासाठी निधी उभा करावा. साधू-महंत जिथे डुबकी मरतील ते पाणी स्वच्छ असले पाहिजे. खूप लोक इथे कुंभमेळा काळात येतील. त्यामुळे स्वच्छतेसाठी शाश्वत उपाययोजना केल्या पाहिजेत. या कुंभमेळ्याला खूप लोक येतील. मागे मी मंत्री झाले तेव्हा कुंभमेळा भरला होता. आता पुन्हा मंत्री झाले आणि पुन्हा कुंभमेळा भरतोय, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *