पंकजा मुंडे यांचे नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात ……

pankaja munde pankaja munde file photo
Spread the love

Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

Pankaja Munde on Rajabhau Munde and Babri Munde : मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील राजाभाऊ मुंडे (Rajabhau Munde) आणि बाबरी मुंडे (Babri Munde) या दोघा पिता पुत्रांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे एकनिष्ठ राहिले होते. यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते. आता यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांचा विषय विधानसभा निवडणुकीवेळीच संपला होता. त्यांनी ज्यांच्या विरोधात माजलगाव मतदारसंघात निवडणूक लढवली आणि आम्ही माजलगावमध्ये ज्यांना निवडून आणले त्यांच्याकडे हे दोघे आता गेले आहेत. त्यामुळे हा विषय आता नव्याने नाही. परंतु पंकजा मुंडे यांचे नाव घेतलं म्हणजे बातम्या होतात. या विषयात पंकजा मुंडेंना धक्का वगैरे असं काही नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

वैद्यनाथ निवडणुकीबाबत पंकजा मुंडे यांचे भाष्य
दरम्यान, बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित 13 जागांसाठी आज मतदान होत असून बँकेचे 43 हजार 962 हजार सदस्य मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 108 केंद्रावर मतदान होणार आहे. बीड जिल्ह्यात 67 मतदान केंद्र आहेत. लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, जळगाव, नाशिक, मुंबई, पिपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यात हे बूथ आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत आमचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो होतो. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होत आहे. त्यावर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *