दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
मुंबई : नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे वरळीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. वरळीच्या कोळीवाड्यात दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बाजूला करण्याचं काम करण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे देखील यावेळी उपस्थित होते.
वरळीतील कोळीवाड्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाली. या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदे तिथून जात असताना आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे परतीच्या मार्गानं गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूनं पुढं गेलं. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यानं मोठी घटना घडला नाही.
एकनाथ शिंदे समुद्राच्या बाजूनं येऊन निघून गेले आहेत. आदित्य ठाकरे आता समुद्राच्या दिशेने गेलं आहेत. हे सगळं होत असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यावेळी तिथं होते. एकनाथ शिंदे पास होत असताना आदित्य ठाकरे नाक्यावर थांबलेले दिसून येत आहे. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्यात पोलिसांना यश मिळालं. आदित्य ठाकरेंसोबत दादर माहीमचे आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे देखील होते.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात येऊन एकनाथ शिंदे कोळीबांधवांना भेटले आहेत. दोन्ही नेत्यांचं स्वागत ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये उत्साह असल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे वरळीच्या कोळीवाड्यात येत त्यांनी कोळी बांधवांसोबत संवाद साधला.
आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे कोळीवाड्यात आले होते, त्यांच्यासोबत देखील कोळी बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेत्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.