Chitra Wagh Vs Jain Muni: कबुतर खान्यावरून जैन मुनी यांचा संताप

जैन मुनी निलेशचंद्र विजय जैन मुनी निलेशचंद्र विजय
Spread the love

Chitra Wagh Vs Jain Muni: आधी जैन मुनी म्हणाले, आमचा समाज शांतताप्रिय, पुढच्याच वाक्याला म्हणतात, ‘धर्मासाठी शस्त्रंही उचलू’. दादर कबुतरखान्याबाहेर लाखभर जैन बांधव उपोषणाला बसणार

Dadar Kabutar Khana: उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्याचा मनाई आदेश कायम ठेवल्यानंतर आता जैन समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. कबुतरखाने पुन्हा सुरु न झाल्यास येत्या 13 तारखेपासून आंदोलन करु, अशा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी रविवारी दादर कबुतरखान्याबाहेर (Dadar Kabutar Khana) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. निलेशचंद्र विजय यांनी जैन धर्माचा (Jain Community) विषय आल्यास आम्ही न्यायालय आणि सरकारलाही जुमानणार नाही, असे सांगितले. जैन समाजाकडून वेगवेगळ्या न्यायालयात चार वकील तयार ठेवण्यात आले आहेत, असे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी म्हटले.

यावेळी निलेशचंद्र विजय यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हा सगळा विषय चित्रा वाघ आणि मनीषा कायंदेने काढला ना? चित्रा वाघ कबुतरांमुळे माझी मामी मेली, मावशी मेली, असं सांगतात. पहिले त्या चित्रा वाघला विचारा की, दारु आणि कोंबड्या खाऊन किती लोक मेलेत? आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मान ठेवायचा आहे. पण संविधानात लिहलं आहे, 223 कलमात कोणत्या पक्ष्याला मारणं अपराध आहे. आम्ही दादर कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांना खाणं टाकू नका, असा कोणताही बॅनर लावलेला नाही,असे जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केले.

आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी
आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो ना? कोर्टाला मानतो ना? देवेंद्र फडणवीसला मानतो ना? पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, असे निलेशचंद्र विजय यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *