Chhagan Bhujbal : अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; छगन भुजबळांचा दावा

chagan bhujbal chagan bhujbal
Spread the love

Chhagan Bhujbal : कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलाय.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. आता माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यामुळे कृषी खाते राज्यभरात चर्चेत आलेले असतानाच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा दावा केलाय. अजित पवारांनी (Ajit Pawar) मला कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती. भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केलाय. छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खातं चांगलं आहे, हे तुम्ही घ्या. असा दावा त्यांनी केला आहे. 

भरणे मामा पदाला न्याय देतील

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला. पण ग्रामीण भागातील लोकांना द्या, हे मी सांगितले. कारण माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहते. पण, त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता भरणे मामा या पदाला न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो.  भरणे मामा यांनी काही अडचण येईल, असं वाटत नाही. प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं. प्रत्येक खातं हे चांगलं आहे. आपण कसे काम करतो यावर ते अवलंबून असते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *