Gold Rate नवी दिल्ली: सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 596 रुपयांनी वाढून 100672 रुपयांवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात 1154 रुपये प्रति किलो अशी वाढ पाहायला मिळाली. चांदीचे दर आता 113576 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचे दर 103692 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह चांदीचे एका किलोचे दर 116983 रुपयांवर पोहोचले आहेत.
मंगळवारी चांदीचे जीएसटीशिवायचे दर 112422 रुपयांवर पोहोचले होते. सोन्याचे दर 100076 रुपये होते. सोने दरानं 100533 रुपयांचा उच्चांक ओलांडला आहे. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 100672 रुपयांवर पोहोचला आहे. 6 ऑगस्टला दुपारी 12.37 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या अधिकृत वेबसाईटनुसार सोन्याचे दर 101089 रुपये होते. तर, चांदीचा दर 113445 रुपे होता.
सर्राफा बाजारात सोन्याचे एका तोळ्याचे दर 24932 रुपयांनी वाढले तर चांदी 27559 रुपयांनी महागली आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचे दर 75740 रुपयांवर होते. तर, चांदीचे दर 86017 रुपये किलो होते.
आज 23 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 592 रुपयांनी वाढून 100269 रुपये झाले आहेत. जीएसटीसह हा दर 103277 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 594 रुपयांनी 92216 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 94982 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या 18 कॅरेट सोन्याचा दर 483 रुपयांनी वाढून 75540 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह एका तोळ्याचा दर 77806 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 60659 रुपये झाला आहे.
सोने आणि चांदीचे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी केले जातात. तुमच्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात 1000 ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेएकडून एका दिवसात दोन वेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात.
सोने दर का वाढले?
स्टॉकिस्ट किंवा ठोक व्यापाऱ्यांकडून जोरदार सोने खरेदी सुरु आहे. बाजारात मागणी वाढते तेव्हा सोन्याचे दर वाढतात. याशिवाय सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोने खरेदी सुरु केली आहे. कारण आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. याशिवाय औषधं आणि चिप्स वर नव्यानं शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. यामुळं जागतिक बाजारात भीतीचं वातावरण आहे.
भारतात सोन्याचे दर, आयात शुल्क आणि कर, रुपया आणि डॉलर यांच्यातील विनिमय दर, मागणी आणि पुरवठा याच्यातील संतुलन याच्या आधारावर सोन्याचे दर निश्चित होतात. भारतात सोन्याचा वापर फक्त गुंतवणूक म्हणून नाही तर लग्नसराई आणि सणांच्या काळात होतो. त्यामुळं सोने दरातील बदल सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असतात.