Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय – भास्कर जाधव

bhaskar jadhav with ramdas kadam bhaskar jadhav with ramdas kadam
Spread the love

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागलं आहे. रामदास नव्हे बामदास कदम, तो ठार येडा झालाय.., असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. गुहागरमधील भाषणात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.

30 वर्षे बार चालवणाऱ्या रामदास कदम यांना लाज वाटली पाहिजे. रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही. पण रामदास कदम विधान भवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडलेत. भास्कर जाधव एकवेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही. लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे. मंत्री नाही झालो, तर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार, असं सूतोवाच भास्कर जाधव यांनी केलं. 

भास्कर जाधवांनी योगेश कदमांविरुद्ध थेट उमेदवारच केला जाहीर-

कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर सभेतच उमेदवारच जाहीर केला. जेवढा निधी आमदार म्हणून दापोली विधानसभा मतदार संघात आणतो, त्यापेक्षा जास्त निधी यापुढे गुहागर मतदार संघात देणार, असंही भास्कर जाधव म्हणाले. मंत्री योगेश कदम यांचा गुहागर मतदारसंघात हस्तक्षेप भास्कर जाधव यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गुहागरमधल्या मेळाव्यात योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांकडून कुणबी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. आमदार व्हायचं आहे तर दापोली मतदार संघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा, असं भास्कर जाधव सहदेव बेटकरांना म्हणाले. सहदेव बेटकर हे 2019 मध्ये भास्कर जाधवांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असून सध्या शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

योगेश कदमांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ- रामदास कदम

योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा मागत असल्याची टीका रामदास कदम यांनी विरोधकांवर केली. गुहागर विधानसभा मतदार संघातील  शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *