मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता मिळणार

Mukhyamantri-Majhi-Ladki-Bahin-Yojana- Mukhyamantri-Majhi-Ladki-Bahin-Yojana-
Spread the love

कोल्हापूर : राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारकडून मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहावी लागत असून 1500 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार, याचीच वाट पाहिली जात आहे. आता, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन (Rakshabandhan) पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 महिन्यांचा हफ्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट 3 हजार रुपये मिळाले होते. मात्र, यंदा एकच हफ्ता मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिला आहे. या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार, पुढील 15 दिवसांत बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तीने याचा लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहिण योजनेच्या हफ्त्यासंदर्भात माहिती दिली होती.

आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं.

12 वा हफ्त जमा होणार
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा 12 वा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल. आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *