सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं.

सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात.

पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र, ही एक गंभीर आरोग्य संकेत असू शकतो.

पांढरट दिसणं हे शरीरातील रक्तातल्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेचं (anemia) लक्षण असू शकतं.

याशिवाय प्रोटीन, झिंक, आयर्न किंवा व्हिटॅमिन B12 यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता देखील नखांवर अशा स्वरूपात दिसून येते

कधी कधी यकृत विकार, पचनसंस्था ठीक नसेल, किंवा फंगल इन्फेक्शनमुळेही नखांचा रंग बदलू शकतो

त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आहारातून योग्य पोषण मिळवणं गरजेचं आहे.

पूर्ण पांढरं नखं (total leukonychia) हे सहसा अॅनिमिया, लिव्हर सायरॉसिस किंवा किडनीच्या आजारांशी संबंधित असतात

तर काही वेळा हे औषधांच्या साइड इफेक्टमुळे (उदा. अँटीबायोटिक्स, केमोथेरपी) देखील होऊ शकतं.

डिहायड्रेशनमुळे नखं कोरडी, फिकट आणि ठिसूळ होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नखांना पुरेसे पोषण आणि आर्द्रता मिळत नाही, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि सहज तुटतात. याशिवाय, डिहायड्रेशनमुळे नखांभोवतीची त्वचा देखील कोरडी आणि खरखरीत होऊ शकते.
नखांच्या आरोग्यासाठी खालील उपाय करू शकता:
नखांची काळजी: जास्त रसायनांचा वापर टाळा आणि नखं जास्त कापू नका.
पुरेसे पाणी प्या: दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
पौष्टिक आहार: बायोटिन, प्रथिने, झिंक आणि व्हिटॅमिन E युक्त आहार घ्या (उदा., अंडी, नट्स, हिरव्या पालेभाज्या).
मॉइश्चरायझर वापरा: नखांभोवती क्युटीकल ऑइल किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम लावा.

वरील सर्व माहिती मानवी आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने मंडळी आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा