Uddhav thakare on Raj Thakare होय , ठाकरे बंधू एकत्रच : उद्धव ठाकरे

Spread the love

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई: ठाकरे बंधू एकत्रच आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कधीही भेटू शकतो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरेंनी दिलं. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं. 

राज आणि उद्धव ठाकरेंची राजकीय युती होईल?

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’, त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरेंसोबत चर्चाही होईल- उद्धव ठाकरे

मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू. याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा?, असं प्रश्न संजय राऊतांनी विचारताच लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार..आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच. लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं. आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. याबाबत राज ठाकरेंसोबत चर्चाही होईल. पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोडके, हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *