सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र राठोड तर शिंदेंच्या शिवसेनेचे रंगनाथ वराडे यांची व्हा. चेअरमन पदावर निवड झाली.

राजेंद्र राठोड आणि रंगनाथ वराडे यांच्या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सध्या दोन्ही शिवसेनेतले तणाव सगळ्यांना माहिती आहेत मात्र तालुक्याच्या या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यात यश मिळवले अशी चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे बाजार समितीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर पॅनेलद्वारे लढवल्या जातात.
सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमन पदी रंगनाथ वराडे यांची निवड झाली. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
