एकनाथ शिंदेंची वारी ,दिल्लीच्या दरबारी

Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK Eknath shinde meet with Amit shah Photo source -eknath shinde FACEBOOK
Spread the love

Eknath Shinde Narendra Modi And Amit Shah Meet: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा (Eknath Shinde Delhi Visit) चर्चेत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणींचा पाढा एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे वाचल्याचं सांगण्यात येतंय.

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटं एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनासोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सुनबाई हजर होत्या. एकनाथ शिंदेंनी मोदींना शंकराची प्रतिमा भेट दिली. ऑपरेशन महादेवच्या यशामुळे शंकराची प्रतिमा नरेंद्र मोदींना भेट दिल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. 

महायुतीतल्या अडचणींच्या मुद्द्यावर यावेळी एकनाथ शिंदेंनी अमित शाहांशी चर्चा केल्याचं समजतंय. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शाहांनी यावेळी दिलं. अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *